महाडीबीटी पोर्टल (MahaDBT - "अर्ज एक, योजना अनेक")
महाराष्ट्र डी.बी.टी. पोर्टल हे महाराष्ट्र शासनाचे शेतकऱ्यांना विविध कृषि कल्याणकारी योजना आणि अनुदानांचा लाभ मिळविण्यासाठी एकल-खिडकी डिजिटल व्यासपीठ आहे. या पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी योजनांची पात्रता तपासू शकतात, ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात, आवश्यक कागदपत्रे अपलोड करू शकतात तसेच पारदर्शक आणि कागदरहीत प्रक्रियेद्वारे अर्जाच्या स्थितीचा मागोवा घेऊ शकतात.
1. पोर्टलची वैशिष्ट्ये व कार्यप्रणाली:
अनेक शासकीय प्रणालींशी एकात्मिक असलेले हे व्यासपीठ लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये अनुदानाची पडताळणी आणि थेट लाभ हस्तांतरण (डी.बी.टी.) सुलभ करते. मानवी हस्तक्षेप तसेच एकूण प्रक्रियेस लागणारा वेळ कमी करून हे पोर्टल कार्यक्षमता, पारदर्शकता आणि सेवांची सुलभता वाढवते. त्यामुळे राज्यभरातील कृषी योजनांचे लाभ वेळेवर वितरित होण्यास मदत होते तसेच योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी आणि देखरेखीला बळ मिळते.
2. ऑनलाइन सेवा व महत्त्वाच्या लिंक्स:
3. महाडीबीटी पोर्टल अंतर्गत समाविष्ट प्रमुख शेतकरी योजना:
4. सर्वसाधारण आवश्यक कागदपत्रे:
- ७/१२ उतारा व ८-अ नोंद
- आधार संलग्न बँक बचत खाते पासबुक प्रत
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास - अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी)
- निविष्ठा / अवजारे खरेदी कोटेशन किंवा पूर्वसंमती पत्र